अधिकृत संघटनात्मक नियमावली

सक्रीय कार्यकर्ता व पदाधिकारी आचारसंहिता

माहिती अधिकार कायदा प्रचार-प्रसार, शाखा स्थापना, पदाधिकारी रचना, जबाबदाऱ्या व शिस्तभंगाची अधिकृत आचारसंहिता.

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ)

माहिती अधिकार चळवळ पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख चालवण्यासाठी सर्व शाखा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खालील नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.

शाखा स्थापनेसाठी किमान ५ नोंदणीकृत कार्यकर्ते आवश्यक

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघाची) शाखा स्थापन करताना पदाधिकारी म्हणून किमान पाच नागरिक एकत्र येणे आवश्यक आहे. ते नागरिक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नोंदणीकृत कार्यकर्ते असणे अनिवार्य आहे.

शाखा पातळी व १६ अधिकृत पदाधिकाऱ्यांची रचना

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघाची) जिल्हा, तालुका, शहर, गाव अशा स्थानावर शाखा स्थापन करता येईल. यात खालीलप्रमाणे १६ पदाधिकारी रचना करता येईल:

१. अध्यक्ष २. कार्याध्यक्ष ३. उपाध्यक्ष ४. सचिव ५. सहसचिव ६. मुख्य संघटक ७. उपसंघटक ८. सहसंघटक ९. मुख्य संपर्कप्रमुख १०. संपर्कप्रमुख ११. सह संपर्क प्रमुख १२. मुख्य प्रचारप्रमुख १३. प्रचारप्रमुख १४. सहप्रचार प्रमुख १५. सोशल मिडिया प्रमुख
टीप: सदर पदे केवळ मानद स्वरूपाची असतील. यात माहिती अधिकार अधिनियमाचा प्रचार व प्रसार आणि माहितीगार समाज निर्माणाचे काम शिस्तबद्ध व्हावे, याशिवाय कोणताही वेगळा हेतू नाही.

दरमहा मासिक बैठक व केंद्रीय कार्यालयास अहवाल

प्रत्येक शाखेने माहिती अधिकार फेडरेशन (महासंघाची) प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बैठकीचा अहवाल अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिवांच्या सहीनिशी प्रत्येक महिन्याला केंद्रीय कार्यालय, नवी मुंबई यांना पाठविणे आवश्यक आहे. अहवालात बैठकीत घेतलेले निर्णय, उपस्थित कार्यकर्त्यांची नावे व मोबाईल नंबर यांचा समावेश असावा. कोणत्याही शाखेने सलग तीन महिने अहवाल न पाठविल्यास सदरील शाखा तसेच सदरील शाखेचे पदाधिकारी यांना दिलेली पदे स्थगित झाली असे समजण्यात येईल.

दरमहा किमान ५ नवे कार्यकर्ते जोडणे बंधनकारक

माहिती अधिकार कायद्याचा प्रसार व प्रचार म्हणून प्रत्येक शाखेने दरमहा किमान पाच नवे कार्यकर्ते जोडणे बंधनकारक आहे. सलग सहा महिने अहवाल न पाठविल्यास, नवे सदस्य नोंदणी व संपर्क न केल्यास सदरील शाखा बरखास्त झाली असे समजण्यात येईल.

शाखेचे अधिकृत लेटरपॅड व पदाधिकारी नावांची नोंद

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन कोणत्याही शाखेला लेटरपॅड काढताना त्यावर किमान पाच पदाधिकारी यांची नावे व मोबाईल नंबर छापून घ्यावेच लागतील. लेटर पॅड हे संपूर्ण शाखेचे असेल. अध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही पदाधिकारी यांना केवळ स्वतःचे एक नाव असणारे व्यक्तिगत लेटरपॅड छापता व वापरता येणार नाही.

प्रशासकीय मागण्यांसाठी पत्रव्यवहार नियम

लेटरपॅडचा वापर प्रशासकीय आस्थापनांना विविध मागण्या करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यासाठी करता येईल. सरकारी आस्थापना व लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या प्रत्येक लेटरपॅडवरील मागणीपत्रावर किमान तीन पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या असणे आवश्यक आहे.

रबरी शिक्का (Rubber Stamp) वापराची जबाबदारी

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या नावाने कोणत्याही शाखेस रबरी शिक्का तयार करता येईल, परंतु हा शिक्का जबाबदारीने वापरण्याची जबाबदारी अध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकारी यांची सर्वस्वी असेल.

RTI अर्जावर लेटरपॅड किंवा शिक्का वापरण्यास सक्त मनाई!

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघाचे) लेटरपॅड किंवा रबरी शिक्का यांचा वापर माहिती मागविण्यासाठी असलेल्या जोडपत्र 'अ', 'ब' किंवा 'क' या प्रपत्रावर करता येणार नाही. लेटरपॅडवर माहितीचा अधिकार अर्ज लिहून व छापून शासकीय कार्यालयाला माहिती मागण्यास सक्त मनाई आहे.

बेकायदेशीर वर्तवणूक व गैरकृत्य केल्यास तात्काळ हकालपट्टी

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघाच्या) प्रत्येक पदाधिकारी व प्रत्येक सदस्यांना माहिती अधिकार कायद्याचा वापर करताना कोणतेही बेकायदेशीर काम व बेकायदेशीर वर्तवणूक करण्यास सक्त मनाई आहे. ओळखपत्राचा आधार घेऊन कोणतेही गैरकृत्य करण्यास सक्त मनाई असून असा प्रकार कळल्यास किंवा आढळून आल्यास सदस्यत्व बरखास्त करून संघामधून तात्काळ हकालपट्टी करून कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

१०

शिस्तभंग कार्यवाही व अधिकार रद्द

या आचारसंहितेतील कोणत्याही कलमांचे जर कार्यकर्त्यांकडून उल्लंघन झाले तर तात्काळ शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, तसेच दिलेले पद व सर्व अधिकार तात्काळ काढून घेतले जातील.

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनमध्ये सामील व्हा!

आचारसंहितेचे पालन करून पारदर्शक लोकशाहीच्या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवा व अधिकृत कार्यकर्ता ओळखपत्र मिळवा.

सक्रीय कार्यकर्ता अर्ज भरा