माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन

ऑनलाईन कार्यकर्ता नोंदणी अर्ज

३ वर्षांचे अधिकृत ओळखपत्र, सन्मानपत्र व कायदेशीर मार्गदर्शन मिळवा!

कृपया पूर्ण नाव व पत्ता हा मराठीतून भरावा
सेव्ह केलेला अर्ज: माहिती पूर्ववत लोड केली आहे. आपण उर्वरित माहिती भरू शकता.
बॅक केल्यास माहिती सुरक्षित राहील ऑटो-सेव्ह चालू
१
वैयक्तिक माहिती व पत्ता
पायरी १ / ३
या नंबरवर ओळखपत्र व सूचना पाठवल्या जातील.
२
कागदपत्रे व संदर्भ
पायरी २ / ३
📷 आधार फोटो काढा / फाइल निवडा
सर्व फोटो फॉरमॅट्स, PDF किंवा DOCX (Max 10MB)
📷 सेल्फी किंवा फोटो निवडा
ओळखपत्रावर छापण्यासाठी स्पष्ट फोटो (Max 10MB)
३
नोंदणी शुल्क व ऑनलाईन पेमेंट
पायरी ३ / ३
आपले अर्ज तपशील व कागदपत्रे आधीच सेव्ह केलेली आहेत!
नोंदणी पूर्ण करण्यासाठी खालील ₹७००/- सेवा शुल्क भरावे.
कालावधी (Validity): ३ वर्षे अधिकृत कार्यकर्ता नोंदणी
एकूण देय शुल्क: ₹७००/-
मिळणारे साहित्य: डिजिटल आयडी व नियुक्तीपत्र (१२-२४ तासात WhatsApp वर) + पीव्हीसी कार्ड, होल्डर, लेस + माहिती अधिकार पुस्तक घरपोच पार्सलने (२०-२५ दिवसात).
१००% सुरक्षित ऑनलाईन पेमेंट (Cashfree) 256-bit SSL
GPay PhonePe Paytm Dynamic QR डेबिट / क्रेडिट कार्ड नेटबँकिंग
सबमिट केल्यानंतर थेट सुरक्षित Cashfree पेमेंट विंडो उघडेल.
शपथपत्र

मी प्रतिज्ञापूर्वक आणि शपथपूर्वक निवेदन करतो कि मला मिळालेल्या पदाचा / ओळखपत्राचा गैरवापर करणार नाही. तसे आढळल्यास तात्काळ एकतर्फी कारवाई केली जाईल हे मी समजून घेतले आहे. मी सभासद म्हणून भारतीय संविधान व कायदेशीर कक्षेतच कार्य करीन. सभासद होताना संघटनेने विहित केलेल्या अटी व शर्ती मला मान्य आहेत.

सामाजिक योगदान व वैयक्तिक विकास

🏆 कार्यकर्ता झालो तर मला काय मिळेल?

खूप कार्यकर्ते विचारतात की मी माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा नोंदणीकृत कार्यकर्ता झालो तर मला काय मिळेल? असं काम करणं ही एक समाजसेवा आहे, पण इथे खूप मोठे वैयक्तिक व सामाजिक लाभ मिळतात, जसे की...

१
कायद्यांची सखोल माहिती

विविध व दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व कायद्यांची व शासकीय नियमांची अचूक माहिती होते.

२
सरकारी यंत्रणेचे कामकाज समजते

प्रशासन, नोकरशाही व सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती प्रत्यक्षात कशी चालते हे माहीत होते.

३
लाच न देता कायदेशीर कामे

शासकीय कार्यालयात एकही रुपया लाच न देता स्वतःची व इतरांची कायदेशीर कामे पूर्ण करून घेता येतात.

४
नातेवाईक व शेजाऱ्यांना मदत

आपल्या आसपासच्या मित्र, नातेवाईक व शेजाऱ्यांची सरकारी कामात अडवणूक होत असल्यास माहिती अधिकाराने त्यांना मदत करता येते.

५
राज्यस्तरीय नेटवर्कचा हिस्सा

तुम्ही एका मोठ्या राज्यस्तरीय व देशपातळीवरील नेटवर्कचा हिस्सा बनता; अनुभवी कार्यकर्ते व समाजसेवकांच्या ओळखी होतात.

६
रोज सातत्याने मार्गदर्शन व प्रशिक्षण

माहिती अधिकार व्हॉट्सॲप ग्रुप्समधून दररोज नवनवीन माहिती, कायदे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षण मिळते.

७
धीटपणा व आत्मविश्वास वृद्धी

विविध कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रत्यक्ष भाग घेता येतो. व्यक्ती धीट बनते आणि कामाचा आत्मविश्वास वाढतो.

८
प्रशासन लोकाभिमुख बनवण्यात योगदान

शासन व्यवस्था व प्रशासन पारदर्शी, गतिमान व लोकाभिमुख बनवण्यात आपले थेट सामाजिक योगदान देता येते.

९
कायदेशीर Drafting (मांडणी) कौशल्य

अर्ज व तक्रारींची कायदेशीर मांडणी (Drafting) सुधारते आणि ऑनलाईन तज्ज्ञ प्रशिक्षण मिळते.

१०
हक्क व कर्तव्यांची जाणीव

भारतीय लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून आपले मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची पूर्ण जाणीव निर्माण होते.

"आयुष्यात तुम्ही कोणतंही काम करा, नोकरी करा, व्यवसाय करा... तुमच्या आवडीच्या किंवा संधी मिळेल त्या कोणत्याही क्षेत्रात काम करा. पण तुम्ही काही दिवस किमान तीन वर्षे तरी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अवश्य काम करा. जीवनात खूप काही शिकायला मिळतं!"

वर जाऊन कार्यकर्ता नोंदणी फॉर्म भरा 👆
सामान्य शंका व समाधान

❓ नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

माहिती अधिकार कार्यकर्ता नोंदणी व संघटनेच्या कार्यपद्धतीबाबतची सविस्तर अधिकृत उत्तरे खालीलप्रमाणे आहेत:

कोणताही भारतीय नागरिक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कार्य करू शकतो. कार्य करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या संघटनेचा (ज्याला आपण महासंघ म्हणतो) सभासद व्हावेच लागते असे कोणतेही बंधन नाही. प्रत्येकजण कार्य करण्यासाठी स्वतंत्र आहे.

पण ज्यांना इच्छा आहे व आवश्यकता वाटते, प्रशिक्षण घेऊन आपल्या क्षमता वृद्धिंगत कराव्या वाटतात, असे कार्यकर्ते नोंदणी करून नोंदणीकृत कार्यकर्ता (Registered Volunteer Activist) म्हणून संस्थेबरोबर समाजसेवा करू शकतात.

उत्तर : होय! आपली माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही संस्था केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) - द कंपनी ॲक्ट २०१३ च्या सेक्शन ८ नुसार नोंदणीकृत अशासकीय संस्था (Non-Profit Organisation) आहे.

🏛️ अधिकृत संस्था रजिस्ट्रेशन क्रमांक (CIN): U85300MH2022NPL383632
देशभर जनतेचे हक्क व अधिकार यांचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर (All India) आहे.

उत्तर : आपली संघटना मा. अण्णा हजारे यांना आदरणीय व आदर्श मानते. माहिती अधिकार कायदा मंजूर व्हावा म्हणून मा. अण्णासाहेब हजारे यांनी दिलेला ऐतिहासिक लढा व प्रयत्न यांसाठी आम्ही त्यांचे ऋणी व कृतज्ञ आहोत. परंतु मा. अण्णा हजारे यांचा आपल्या संस्था व संघटनेशी थेट संबंध नाही.

उत्तर : होय! आपली संघटना लोकशाही आणि भारतीय संविधानाला सर्वोच्च प्रमाण मानते.

भारतीय संविधान कलम १९ (१)(बी) अन्वये सर्व नागरिकांना निशस्त्र एकत्र येण्याचा अधिकार व कलम १९ (१)(सी) अन्वये संघटना स्थापन करून अहिंसक मार्गाने कार्य करण्यावर संघटना दृढ विश्वास ठेवते.

उत्तर : किमान सेवा व प्रशिक्षण शुल्क (३ वर्षांसाठी ₹७००/-) भरून कोणीही सज्ञान भारतीय नागरिक संस्थेचा स्वयंसेवी कार्यकर्ता (Volunteer Activist) बनू शकतो.

त्याला संघटनेकडून नियमित मार्गदर्शन, प्रशिक्षण व जागरूक नागरिक बनण्यासाठी क्षमता विकसित करता येतात आणि शासन व प्रशासन पारदर्शक बनवण्यासाठी सामाजिक योगदान देता येते.