माहिती अधिकार चळवळीत सहभागी व्हा, सामाजिक न्यायासाठी आणि पारदर्शकतेसाठी एकत्र या!
खूप कार्यकर्ते विचारतात की मी माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा नोंदणीकृत कार्यकर्ता झालो तर मला काय मिळेल? असं काम करणं ही एक समाजसेवा आहे, पण इथे खूप मोठे वैयक्तिक व सामाजिक लाभ मिळतात, जसे की...
विविध व दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व कायद्यांची व शासकीय नियमांची अचूक माहिती होते.
प्रशासन, नोकरशाही व सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती प्रत्यक्षात कशी चालते हे माहीत होते.
शासकीय कार्यालयात एकही रुपया लाच न देता स्वतःची व इतरांची कायदेशीर कामे पूर्ण करून घेता येतात.
आपल्या आसपासच्या मित्र, नातेवाईक व शेजाऱ्यांची सरकारी कामात अडवणूक होत असल्यास माहिती अधिकाराने त्यांना मदत करता येते.
तुम्ही एका मोठ्या राज्यस्तरीय व देशपातळीवरील नेटवर्कचा हिस्सा बनता; अनुभवी कार्यकर्ते व समाजसेवकांच्या ओळखी होतात.
माहिती अधिकार व्हॉट्सॲप ग्रुप्समधून दररोज नवनवीन माहिती, कायदे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षण मिळते.
विविध कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रत्यक्ष भाग घेता येतो. व्यक्ती धीट बनते आणि कामाचा आत्मविश्वास वाढतो.
शासन व्यवस्था व प्रशासन पारदर्शी, गतिमान व लोकाभिमुख बनवण्यात आपले थेट सामाजिक योगदान देता येते.
अर्ज व तक्रारींची कायदेशीर मांडणी (Drafting) सुधारते आणि ऑनलाईन तज्ज्ञ प्रशिक्षण मिळते.
भारतीय लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून आपले मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची पूर्ण जाणीव निर्माण होते.
"आयुष्यात तुम्ही कोणतंही काम करा, नोकरी करा, व्यवसाय करा... तुमच्या आवडीच्या किंवा संधी मिळेल त्या कोणत्याही क्षेत्रात काम करा. पण तुम्ही काही दिवस किमान तीन वर्षे तरी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अवश्य काम करा. जीवनात खूप काही शिकायला मिळतं!"
वर जाऊन कार्यकर्ता नोंदणी फॉर्म भरा 👆माहिती अधिकार कार्यकर्ता नोंदणी व संघटनेच्या कार्यपद्धतीबाबतची सविस्तर अधिकृत उत्तरे खालीलप्रमाणे आहेत:
U85300MH2022NPL383632